भोपाळ – काँग्रेसने दोन राज्यात पूर्ण बहुमत मिळवल्यानंतर मध्यप्रदेशमध्ये गाडी अडली आहे. तब्बल २४ तासांनंतर मध्यप्रदेशची मतमोजणी पूर्ण झाली असून काँग्रेसला ११४ जागांवर विजय मिळाला आहे. प्रतिस्पर्धी भाजपला १०९ जागा मिळाल्या आहेत. २३० जागांच्या मध्यप्रदेश विधानसभेत बहुमतासाठीच्या ११६ जागा दोन्ही पक्षांकडे नाहीत. मात्र काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असल्यामुळे ते सत्तास्थापनेचा दाव करणार आहेत.
अपक्ष आणि बसपाचा पाठिंबा
कोणाला?
मध्यप्रदेशमध्ये १५
वर्षांपासून असलेली भाजपची सत्ता काँग्रेसने उलथवून लावली आहे. शेतकरी संपादरम्यान
मंदसौर येथे शिवराजसिंह सरकारच्या पोलिसांनी केलेला गोळीबार, व्यापम घोटाळा आणि बेरोजगारी
या मुद्द्यांवर काँग्रेसने लक्ष्य केंद्रीत करत भाजपवर चौफेर हल्ला केला होता.
त्याचाच परिणाम निवडणूक निकालात दिसून आला.
मंगळवारी सुरु झालेली
मतमोजणी बुधवारी सकाळी सव्वा आठ वाजता संपली. काँग्रेसला ११४, भाजप १०९, बसपा २,
सपा १ आणि चार अपक्ष विजयी झाले आहेत. बहुमतासाठी ११६ जागांची आवश्यकता आहे.
काँग्रेस बहुमतापासून २ जागा दूर आहे. बसपा आणि चार अपक्ष कोणाच्या बाजूने झुकतात
हे आता पाहायचे आहे. विशेष म्हणजे निवडून आलेले चारही अपक्ष हे काँग्रेसचे आहेत.
दुसरीकडे, भाजपनेही ट्विट करुन सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार असल्याचा दावा
केला आहे. काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी रात्रीच फॅक्स आणि ई-मेलद्वारे राज्यपालांना
भेटीसाठी वेळ मागितला आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच भेटीसाठी वेळ दिला जाईल असे
राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज दिवसभर कोण आधी
सत्तास्थापनेचा दावा करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.